Rishi Sunak, Racism  
ग्लोबल

'ते' शब्द मनाला वेदनादायक वाटायचे; ब्रिटन अर्थमंत्र्यांची दाहक प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

लंडन- भारतीय वंशाचे ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. लहानपणी मलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता देशाने खूप प्रगती केली आहे, असं ते म्हणाले आहेत. सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून ते सध्या ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत. लंडनमध्ये गेल्या आठवडण्यात वर्णभेदाविरोधात आंदोलन झाले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सुनक यांना यावर प्रतिक्रिया देण्यात सांगितले होते. ब्रिटनमध्ये लहानाचा मोठा होत असताना मला वर्णभेदाचा अनुभव आला आहे. खासकरुन जेव्हा माझे लहान भाऊ-बहीण सोबत असायचे त्यावेळी अधिक वाईट वाटायचं, असं ते म्हणाले आहेत. ते स्काई न्यूजशी बोलत होते. 

वर्णभेदाच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र, ब्रिटन हा नेहमी उदारमतवादी आणि सहिष्णु देश राहिला आहे. नेहमी काही लोकांचा एक गट असतो जो पूर्वग्रह युक्त असतो. मुलत: तो वर्णवादी असतो. जेव्हा माझे आजी-आजोबा या देशात आले होते, मी लहानाचा मोठा होत होतो, तेव्हापासून आपल्या समाजाने आणि देशाने खूप प्रगती केली आहे, असं ते म्हणाले आहेत. काही शब्द साधे वाटतात. पण हे शब्द असे टोचतात, जसे दुसरी कोणतीही गोष्ट टोचत नाही. वर्णभेदाचे शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडतात तेव्हा तुमच्या ह्रद्याला हजारो छिद्र पडत असल्याचा अनुभव येत असल्याचं सुनक म्हणाले.

लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावर सुनक यांनी भाष्य केलं आहे. हिंसाचाराची घटना स्तब्ध करणारी आणि तिरस्कार वाटण्यासारखी आहे. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, कृष्णवर्णीय अमेरिकेन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलीस कारवाईत झालेल्या मृत्यूमुळे वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशातील नागरिक वर्णभेदाविरोधात रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT